1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2019 (12:39 IST)

पाण्याच्या दुष्काळी लातूरचा सुपुत्र झाला गुवाहाटी वायूदळाचा कमांडर

son of late Latur
लातूरच्या निलंगा तालुक्यातील चिलवंतवाडी येथील शेतकरी कुटूंबाचा वारसा असणारे व्यंकट तुकाराम मरे यांनी देशाच्या वायुदलात सेवा सुरु केली होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत शिक्षण पूर्ण केलेल्या आणि सहा हजार तासांपेक्षा अधिक काळापर्यंत हेलीकॉप्टर पायलट म्हणून उड्डाणांचा अनुभव असलेल्या एअर कमांडर व्यंकट मरे यांनी नुकताच आसामची राजधानी गुवाहटी येथील बोरझर एअर स्टेशनचे माजी एअर कमांडर  शशांक मिश्रा यांच्याकडून पदभार स्विकारला आहे. वायुदलातील उड्डाण विभागात सेवा सुरु केल्यानंतर हेलीकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत होते. हे करत असताना त्यांनी जम्मू-कश्मीर, पूर्वांचलच्या (सात राज्यांसह) विविध मोहिमांवर त्यांनी अतिशय प्रभावीपणे आपली भूमिका पार पाडलेली आहे. त्याशिवाय ते अंदमान, निकोबार, बेटावरील वायूदलाच्या तळावर चोखपणे आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. सातारा सैनिक महाविद्यालयात शिकलेल्या व्यंकट तुकाराम मरे यांनी विंलींग्टनच्या सुरक्षा सेवा महाविद्यालयातून पदविका आणि मेहू येथील सेना दलाच्या महाविद्यालयातून पदविका प्राप्त केली आहे. व्यंकट तुकाराम मरे यांनी संयुक्त राष्ट्राच्या कांगोतील प्रजासत्ताक मोहिमेतही महत्वपूर्ण सहभाग नोंदवून देशाचा गौरव वाढविला आहे.