शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (10:38 IST)

सरकार मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक करतंय - डॉ. नरेंद्र काळे

युतीच्या भोंगळ कारभारामुळे मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वैद्यकीय मराठा विद्यार्थ्यांना जागा वाढवून देणार असल्याचे आश्वासन दिले,मात्र तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नाही. सरकार मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केला आहे.
 
जागा वाढवण्यासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची मोठी संख्या लागते. सरकार ऐनवेळी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक कुठून आणणार? सरकार विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयात प्रवेश देत असेल तर शैक्षणिक शुल्कासह वसतिगृह शुल्क आणि इतर शुल्कही सरकार भरणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.