मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्य तापले चंद्रपूर येथे विक्रमी तपमान तर राज्यातील इतर ठिकाणचे तपमान

सध्या देश मॉन्सूनची आतुरतेने  वाट पहात आहे. तर दुसरीकडे  राज्यातील उष्मा अद्यापही कायम असून वाढत  आहे. उलट कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाची वाढले आहे. येत्या  ३ दिवस अशीच स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून,  बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. तर  चंद्रपूर येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  
 
मागील वर्षी राज्यासह देशातील अनेकभागात सरासरीपेक्षा पावसाची टक्केवारी कमी होती. या वर्षी पाणी टंचाई इतकी आहे की तीव्र उष्णतेमुळे धरणांनी देखील तळ गाठला आहे. अंदमानामधे २० मेच्या सुमारास मॉन्सून येतो,  मात्र, अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सूनची पुढील वाटचाल थांबली आहे.  साधारण १५ मे नंतर कमाल तापमानात घट होत असते. मात्र, तापमानात घट होण्याऐवजी सूर्य पुन्हा आग ओकू लागला आहे. 
 
मध्यमहाराष्ट्रात कमाल तापमानात फक्त नाशिकचा अपवाद वगळता इतर ठिकाणी  सरासरी ३ ते ६ अंशांनी वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशाची वाढ झाली असून, पारा ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. विदर्भात बुलडाणा वगळता इतर जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशाच्या पुढे असून, रात्रीच्या उकाड्यात भयानक वाढ झाली आहे. मात्र पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील. 
 
राज्यातील कमाल तापमान : पुणे ३९.७, लोहगाव ४०.९, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३८, महाबळेवर ३४.२, मालेगाव ४२.४, नाशिक ३८.५, सांगली ३९.४, सातारा ४१.२, सोलापूर ४३.८, मराठवाडा - उस्मानाबाद ४३.४, औरंगाबाद ४२, परभणी ४६.१, नांदेड ४४.५, बीड ४४.२, विदर्भ- अकोला ४५.६, अमरावती ४५.८, बुलडाणा ४१.७,  चंद्रपूर ४७.८, गोंदिया ४५.५, नागपूर ४७.५, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५, कोकण- सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३४.६.  अशी नोंद झाली आहे.