रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2019 (14:28 IST)

समर हेल्थ ड्रिंक्स : स्ट्रॉबेरी फ्लोट

साहित्य : अडीच कप स्ट्रॉबेरी क्रश्ड, 1 चमचा लिंबाचा रस, 1 स्कूप व्हेनिला आइसक्रीम, 3/4 कप लेमन फ्लेवर्ड ड्रिंक. 
कृती : सर्वप्रथम ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी क्रश घाला नंतर लिंबाचा रस आणि वेनिला आइसक्रीम घालून त्यात लेमन फ्लेवर्ड ड्रिंक मिसळा. लगेचच सर्व्ह करा. 

लीची  शॉट्स 
साहित्य : 15 लिची बिया काढलेल्या, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा साखर, 2-3 बर्फाचे क्यूब्ज. 
कृती : मिक्सरमध्ये लीची आणि साखरेला ग्राईंड करून घ्या. 1 ग्लास गार पाणी घालून परत एकदा फिरवून नंतर त्याला गाळून घ्या. ग्लासमध्ये घालून त्यात लिंबाचा रस आणि आईस क्यूब्ज घालून गार गार सर्व्ह करा.