शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (14:31 IST)

पेरूचे आरोग्यदायी सरबत

साहित्य
 
एक पिकलेला पेरू, दोन चमचे साखर (चवीनुसार), अर्धा इंच अद्रकाचा (आलं) तुकडा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक ते दीड कप पाणी थंड पाणी
 
कृती
 
पिकलेला पेरू धुवून त्याची साल काढावी. पेरूच्या फोडी करून घ्याव्यात. यानंतर या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकाव्यात. सोबत अद्रक, मीठ, लिंबाचा रस व एक कप थंड पाणी टाकून मिक्सर फिरवावे. हे सर्व मिश्रण गाळून घ्यावे… तुमच्यासाठी ताजे थंडगार सरबत तयार..