झटपट तयार करा तवा राईस
सामुग्री
2 वाटी शिजवलेला भात, 2 अख्ख्या लाल मिरच्या, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, फोडणीसाठी तेल, बारीक चिरलेला एक कांदा, गाजर, टोमॅटो,(इच्छेप्रमाणे), अर्धा वाटी मटार, 1/2 चमचा पाव भाजी मसाला, 1/4 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा तिखट, मीठ स्वादानुसार
कृती
सर्वात आधी गाजर आणि मटार उकळून घ्यावे ज्यानेकरुन नरम होतील. एक मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, अख्ख्या लाल मिरच्या आणि पाव भाजी मसाला टाका. नंतर कांदा, आले-लसूण पेस्ट टाकून मिक्स करा.
नंतर टोमॅटो टाकून हालवून घ्या शिजल्यासारखं वाटल्यावर त्यात मटार आणि गाजर टाका.
नंतर हळद, तिखट, गरम मसाला, मीठ टाका. आता भात टाकून हलक्या हाताने हालवून घ्या. वरून कोथिंबीर, लिंबाने सजवून घ्या. दह्यासोबत सर्व्ह करा.