चविष्ट हॉट डॉग
साहित्य : 12 हॉट डॉग रोल, लोणी किंवा तूप, 1 कप शिजलेले तांदूळ, 2 कापलेले टोमॅटो, 2 कापलेले कांदे, 1 लाल मिरची कापलेली, 1 कप किसलेले चीज, 1/2 चमचा तिखट, चवीनुसार मीठ, रोलवर लावण्यासाठी लोणी.
कृती : रोलला काप करून खोलावे तसेच त्याच्या आतील एका बाजूकडील भाग पोकळ करावा नंतर लोण्यास गरम करून त्यात कांदा भाजून त्यात टोमॅटो आणि तिखट घालून एक मिनिट शिजवावे. भाताबरोबर शिजलेली भाजी मिसळावी, नंतर त्या मिश्रणास रोलच्या पोकळ भागात भरावे. रोलवर लोणी लावून गरम ओव्हनमध्ये बेक करावे आणि गरमा गरम सर्व्ह करावे.