पानं
काही पानं खुडायची असतात. - (चहा)
काही पानं वाढायची असतात. - (केळी, भोजन)
काही पानं चिरायची असतात. - (कोथिंबीर)
काही पानं शिजवायची असतात. -(पालक, मेथी)
काही पानं तळायची असतात. -(अळू, कढीपत्ता)
काही पानं खायची-रंगवायची असतात. -(नागवेल, विडा)
काही पानं कुटायची असतात. - (पुदिना)
काही पानं लुटायची असतात. - (आपटा)
काही पानं पुरायची असतात. - (पालापाचोळा कंपोस्ट)
काही पानं जपायची असतात. - (पिंपळ)
काही पानं तोरणात सजवायची असतात. - (आंबा)
काही पानं केसात माळायची असतात. - (केवडा)
काही पान वाहायची असतात. - (बेल)
काही पानं मानाची असतात.- (नागवेली)
काही पानं खमंग फोडणी साठी असतात. - (कढीपत्ता)
काही पानं शेवटी सोबती येतात. - (कडबा)
काही पानं हातावर रंगवण्यासाठी असतात. - (मेहंदी)
काही पानं नैवेद्याच्या परिपुर्णतेसाठी असतात. - तुळस)
काही पानं फक्त स्वादासाठी असतात. - (पुदिना)
काही पानं मसाल्यासाठी असतात. - (तेजपत्ता)
काही पानं सुशोभिकरणासाठी असतात. - (नारळाच्या झावळ्या)
काही पानं पत्रावळी बनविण्यासाठी असतात. - (पळस)
काही पानं तल्लफ भागविणारी असतात.- (तंबाखू)
काही पानं सत्यनारायण पूजा साठी उपयुक्त असतात.- (कर्दळी)
काही पानं गणपतीला आवडतात. - (आघाडा, हराळी)
काही पानं भरायची असतात. - (वही)
काही पानं जोडायची असतात. - (पुरवणी)
काही पानं लपवायची असतात. - (प्रगती पुस्तक)
काही पानं उलटायची असतात. - (भूतकाळ, दुःखाचे क्षण)
काही पान तोंडाला पुसायची असतात. - (आश्वासन )
तर काही नवीन पानं उघडायची असतात.
काही पानं खेळायची असतात - (पत्ते)
- सोशल मीडिया