शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2019 (10:04 IST)

जातीव्यवस्थेच्या बळी पडलेल्या पायलने आत्महत्या करण्यापूर्वी शेवटच्या तासात नेमके काय झाले वाचा सविस्तर

समाज अजूनही जातीव्यवस्थेने कसा पोखरला गेला आहे, याचे पुन्हा सर्वांसमोर आले आहे. जातीवाचक टोमणे व अपमान करत रॅगिंगला कंटाळून मुंबईतील नायर रुग्णालय वसतीगृहात जळगावच्या गरीब घरातील प्रथम डॉक्टर झालेल्या पायल तडवी ने आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग हादरून गेला आणि जातीव्यवस्थेने सर्व भाग धास्तावला आहे. यावर सध्या पोलिसांनी कारवाई सुरु आहे. मात्र मागील दोन वर्षांपूर्वी पायल हा सर्व त्रास सहन करत होती. मात्र तिचा बांध तुटला आणि हा त्रास तिला सहन झाली नाही आणि तिने आत्महत्येचं केली आहे. मुलीच्या स्वप्नाखातर आयुष्य खर्ची घातलं मात्रं स्वप्न पूर्ण होण्याआधीचं मुलीने आत्महत्या केल्याने तिच्या आईला  अश्रूं आवरत नव्हते, त्या अश्रूंसोबत दु:ख व आक्रोषही वाहत होता. त्यामागचं कारणही तितक भयानक आहे. मुलगी पायलने त्या दिवशी रात्रीच्या जेवणा नंतर  हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉस्टेलमधल्या तीन महिला सहकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल होते, पायल फक्त 26 वर्षीय होती, मोठ्या कष्टाने ती शिक्षण घेवून जळगाव येथून मुंबईत आली होती. तिची चूक म्हणावी लागेल कारण ज्या समाजात जात हा गुण समजला जातो तेथे ती  आदिवासी समाजातील होती. मुंबईच्या नायर रुग्णालयात डॉक्टरकीचं शिक्षण घेत होती. पायलला आरक्षित कोट्यामधून प्रवेश मिळाला होता. तिला आरक्षित कोट्यातून मिळालेल्या प्रवेशामुळेच हिणवलं गेलं आणि तिने या जगाचा निरोप घेतला.तिने आत्महत्या करण्या आगोदर एक तास पूर्वी, 21 मे रोजी पायलच्या सहनशक्तीचा बांध फुटला होता, पायलला तिच्या जाण्याआधी एक तास व्हॉटसअपवर तिला तिच्या सोबतच्या इतर जातीतील मुलीनी जोरदार जातीवाचक  टोमणे मारले होते, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टोमणे मारण्यात आल्यामुळे सर्वांसमोर तिला मोठ्या प्रमाणात अपमान करण्यात आला. या जाचाला कंटाळून पायल त्या दिवशी मजबूर झाली व खूप रडली. यावेळी पायलचा एक सेल्फी फोटो तिघींमधील एकीने पाहिला होता, या फोटोवरून तिला जोरदार टोमणे मारले, ती आदिवासी जातीतील असल्याचे तिला टोमणे त्या तिघींनी तिला मारले होते, पायलला तिच्या खाण्यावरूनही अपमानित केले गेले. तर पायलचे हे फोटो नायरच्या हॉस्पिटलच्या डीनला दाखविण्याची धमकी दिली. शिवाय ऑपरेशन थिएटरमध्ये तुला येऊ देणार नाही, असं म्हणून तिचे जोरदार खच्चीकरण केले होते. मात्र आता सर्व तिला सहन झालं नाही आणि नंतर एका तासातच तिने जगाचा निरोप घेतला. यावेळी मात्र महिला हक्क म्हणून फक्त सोशल मिडीयावर फक्त कलावंताच्या साध्या ट्वीटवरून नोटीस बजावण्यासाठी तात्काळ पुढाकार घेणारा राज्यातील महिला आयोगसुद्धा पायलच्या प्रकरणात झोपला होता. प्रकरणे घडल्यावर नुसती कारवाई करून वा मोर्चे काढून तो पुसला जाणे शक्य नाही. त्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे असून यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. आरक्षण हे फक्त सीट करिता नसून गरिब घरातील मुलांना आणि मुलीना शिकायला पैसे नसतात त्यामूळे शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण आहे, मात्र जातीव्यवस्था इतकी पोखरली गेली आहे की त्याने पायलचा बळी घेतला आहे. आता देवेद्र फडणवीस सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.