शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2019 (09:54 IST)

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : डॉ. भक्ती मेहेरला अटक

डॉ. पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  डॉ. भक्ती मेहेरला अटक हिला पहिली करण्यात आली आहे. 
 
तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ.पायल तडवी यांनी गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे पडसाद संबंध महाराज्यात उमटले आहेत. नायर रुग्णालयाबाहेर आंदोलनं देखील करण्यात आली. याची दखल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली आणि आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती दिली होती. संबंध राज्यात होणारा उद्रेक पाहता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत डॉ. भक्ती हिला बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणात अन्य दोन महिला डॉक्टर डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.