सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (09:22 IST)

निवडणून दिलेले मोदी सरकारमधील निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

लोकसभेचा निकाल लागला आणि आता सरकार स्थापन होणार आहे. मात्र सत्तधारी भाजपा सोबत इतर पक्षात निवडणून आलेले खासदार हे 17 व्या लोकसभा निवडणुकीतील बहुतांश खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. या लोकसभेतील 542 सदस्यांपैकी तब्बल 233 सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. निवडणूक लढताना उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे. तर सर्वाधिक गुन्हे हे केरळच्या इडुक्की मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे डेन कुरिअकोसे यांच्याविरोधात तब्बल 204 गुन्हे दाखल आहे. गुन्हेगारीचा टक्का वाढला आहे असे चित्र सध्या दिसून येते आहे. गेल्या 2009 आणि 2014 च्या लोकसभांच्या तुलनेत यंदा 2019 मध्ये गुन्हेगारी सदस्यांचे प्रमाण 44 टक्क्यांनी वाढली आहे. जवळपास 159 सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधात गुन्ह्यांचा समावेश आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या  खासदारांची पक्ष निहाय संख्या :  
 
▪ भाजप : 116 
▪ संयुक्त जनता दल :  10  
▪ काँग्रेस : 29  
▪ द्रमुक : 11 
▪ तृणमूल : 9