शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2019 (15:39 IST)

मोदींकडून वारंवार होत आहे आचारसंहितेचं उल्लंघन - माजी निवडणूक आयुक्त

नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. हे 
 
ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले, यावरून कुरेशी यांनी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
 
ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलबंन हे केवळ दुर्भाग्य नाही, तर पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी गमावली आहे, असे डॉ. एस.वाय. कुरेशी यांनी म्हटले आहे.
 
कुरेशी यांच्या विधानाला निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलं नाही.