शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2019 (07:16 IST)

पाणी सोडत नाहीत म्हणून नगरसेवक नागरिक झोपले अधिकाऱ्याच्या टेबलवर

नवी मुंबई येथील बदलापूर परिसरातील असलेल्या एरंजाड आणि सोनवली भागात मागील वीस दिवसांपासून अनियमित सोबतच कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या प्रकारामुळे येथील नागरिक पाण्यावाचून फार हैराण झाले. या पाणी प्रश्नासाठी त्यांनी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक हेमंत चतुरे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेलवली येथील कार्यालयात आंदोलन सुरु केले. नगरसेवक हेमंत चतुरे यांनी पाणी प्रश्नासाठी थेट अधिकार्‍यांच्याच टेबलवर झोपून आंदोलन केले यामुळे सर्व अधिकारी आवाक झाले होते. बदलापूर येथील एरंजाड, सोनवली भागात मागील स दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे लोकांना पाण्यासाठी फार कष्ट करावे लागत आहे. त्‍यामुळे पाणी कधी सोडणार असे प्रश्न आणि त्याबद्दल लोकांमध्ये प्रशासनाबद्‍दल मोठा रोष होता. त्‍यामुळे स्‍थानिकांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये म्‍हणून स्‍थानिक नगरसेवक हेमंत चतुरे यांनी लोकांना घेउन थेट बेलवली येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला आंदोलन सुरु केले. अधिकार्‍यांना पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विनंत्‍या करूनही मार्ग निघत नाही, हे पाहून नगरसेवक हेमंत चतुरे यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या टेबलावरच झोपून आंदोलन सुरु  केले होते. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना काय करावे ते कळेना, शेवटी नगरसेवक आणि नागरिक यांना लेखी आश्वासन मिळाले आणि आंदोलन मागे घेतले गेले.