सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 21 मे 2019 (11:52 IST)

पहिला सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारच्याच काळात: भारतीय लष्कराची माहिती

युपीएच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले होते, या काँग्रेसच्या दाव्याला छेद देणारी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. सप्टेंबर 2016 पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाला नसल्याचं भारतीय लष्करानं म्हटलं आहे.  
 
उत्तर विभागाचे जीओसी इन चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी यासंबंधीचं निवेदन दिलं आहे. काही दिवसांपूर्वी माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना DGMOनं पहिली सर्जिकल स्ट्राईक 2016 सालीच झाल्याचं म्हटलं होतं.
राजकीय पक्षांचं यासंबंधी काय म्हणणं आहे, त्याचं उत्तर सरकार देईल. मी केवळ तुम्हाला वस्तुस्थिती सांगत आहे, असंही रणबीर सिंह यांनी म्हटलं.