शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

PAK मध्ये Air Surgical Strike : जाणून घ्या ऑपरेशन मिनिट-टू-मिनिट डिटेल...

भारतीय सेनेने पाकिस्तानवर एक आणखी सर्जिकल स्ट्राइक करत पुलावामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. LoC आणि पाकिस्तानमध्ये 80 किमी आत घुसून ध्वस्त केले दहशतवादी ठिकाण आणि दाखवून दिले की हा नवीन हिंदुस्तान आहे, घरात घुसून हल्ला करतो.
 
कशा प्रकारे कार्यान्वित केले गेले मिशन: भारतीय वायुसेनेने रात्री सुमारे 3.30 वाजता आपल्या डीप पॅनिट्रेशन फायटर जेट्स मिराज 2000 लष्कर विमानांच्या 2 स्क्वॉड्रनला लक्ष्ये सांगून केवळ 21 मिनिटात खाली उड्डाण भरत रडारला धोका देण्यात प्रशिक्षित फायटर पायलेट्सला पाकिस्तान सीमेत पाठवण्यात आले आणि गाइडेड बॉम्ब आणि मिसाइलने 3 ठिकाणी हल्ले केले.
 
भारताचा वज्र : मिराज 2000 भारतीय वायुसेनेत 1985 मध्ये सामील केले गेले होते आणि यांना वज्र नाव देण्यात आले होते. भारतीय सेनेने या ऑपरेशनसाठी मिराज 2000 लष्कर विमान वापरले कारण हे विमान अधिक  तळापर्यंत उड्डाण भरू शकतात.
 
ध्वनीच्या दुप्पट वेगाने उड्डाण घेणार्‍या या फायटर जेट्सने रात्री सुमारे 3.30 वाजता अंबाला एयरबेसहून उड्डाण भरली आणि पाकिस्तान सीमेत 80 किलोमीटर आत शिरून हल्ला केला.
 
सूत्रांप्रमाणे हे विमान बालाकोट आणि मुजफाराबाद पर्यंत पोहचले आणि 1000 वजनाचा बॉम्ब फेकला. रात्री सुमारे 3:45 वाजेपासून 3:55 वाजेपर्यंत मुजफाराबाद आणि नंतर 3:58 वाजेपासून 4:40 वाजेपर्यंत चकोटीमध्ये जैश ए मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर ए ताइबाच्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले.
 
ही पहिली वेळ नाही जेव्हा फायटर जेट मिराज 2000 ने अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी कारगिल ऑपरेशन दरम्यान देखील मिराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. येथे हा उल्लेख करणे देखील आवश्यक आहे की राफेल निर्माता कंपनीच मिराज विमानांची निर्माता आहे.
 
जम्मू-काश्मिरहून बातमी आहे की हल्ला करण्यापूर्वी भारतीय सेनेने सीमेवर पाकिस्तानी गोळीबारीचे चोख उत्तर दिले आणि असे दर्शवले की बहुतेक हल्ला जमिनीहून करण्यात येईल. यापूर्वी पाकिस्तानात केलेल्या रॅकी ऑपरेशन मध्ये टारर्गेट निश्चित केले गेले आणि खुफिया एजंसीद्वारे प्राप्त इनपुट सेनेला सांगण्यात आले. नंतर या पिन पॉइंट ऑपरेशनला कार्यान्वित करण्यात आले. हे ऑपरेशन अत्यंत गुपित ठेवण्यात आले होते. या हल्ल्यात सामील पायलेट आणि एरिया कमांडर यांव्यतिरिक्त या योजनेबद्दल कुणालाही कानोकान खबर नव्हती.