सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पतीचं प्रेम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय

सकाळी अंघोळ करून काही आहार न घेता सर्वात आधी तुळशीला पाणी घालावे, विधिवत पूजा करावी.
 
शुक्रवारी रात्री तीन वेलची स्वत:च्या शरीराला स्पर्श करून कुळदेव किंवा इष्ट देवाला प्रार्थना करत आपल्या पदराला बांधाव्या. दुसर्‍या दिवशी त्या वाटून एखाद्या पदार्थात मिसळून नवर्‍याला खाऊ घालाव्या. असे तीन शुक्रवार केल्यास दांपत्य जीवनात गोडवा येईल.
 
शनिवार अर्धरात्री आपल्या मुठीत जरा लवंगा घेऊन एकवीस वेळा नवर्‍याचं नाव घ्यावे आणि मग लवंगांवर फुंक मारुन अग्नीत समर्पित कराव्या. सात वेळा हा प्रयोग केल्यावर परिणाम दिसून येतील.
 
पतीचं प्रेम मिळवण्यासाठी सर्वप्रथम गणपती नंतर दुर्गा देवीची पूजा करावी. नंतर या मंत्राच्या पाच माळ जपाव्या. 21 दिवस जप करावा.
हे गौरी यथा त्वं शंकरप्रिया, तथा मा कुरु कल्याणी कान्त कांता सुदुर्लभवाम|
 
शुक्ल पक्षाच्या रविवारी सकाळी अंघोळ करुन पूजा स्थळी एका ताटात केशराने स्वस्तिक काढावे आणि त्यावर गंगाजलाने धुतलेलं मोती शंख स्थापित करावे. धूप, गायीच्या तुपाचा दिवा, उदबत्ती, कापुराने पूजा करावी. बत्ताशांच्या नैवेद्य दाखवावा. पूजनानंतर स्फटिक माळ घेऊन दररोज एक महिन्यापर्यंत मंत्र जपवा.
ॐ हृीं वांछितं मे वशमानय स्वाहा
 
नवरा तुमचं मुळीच ऐकत नसेल तर एका लिंबावर नवर्‍याचं नाव लिहून स्वत:जवळ सात दिवस लपवून ठेवावं. सातव्या दिवशी मंत्र जप करावं:
ॐ नमो कामख्या देव्याय ((पती/पत्नी) )मम वश्यं कुरु कुरु स्वाहा,..
सात दिवसाने लिंबू चौरस्त्यावर जाऊन फेकून द्यावा.
 
शुक्ल पक्षात विड्याच्या पानावर चंदन आणि केशर पावडर मिसळून ठेवावं. आता लाल कपड्यावर दुर्गा देवीची मूर्ती स्थापित करुन विड्याचं पान देवीला अर्पित करावं. 43 दिवस देवीसमोर बसून चंडी स्रोताचा पाठ करावा. पाठ केल्यानंतर विड्यावरील मिश्रण कपाळावर लावावं. नंतर पतीसमोर जावं किंवा पतीच्या फोटोसमोर जाऊ शकता. दररोज नवीन विड्याचं पान वापरावं.