गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 डिसेंबर 2018 (17:37 IST)

अनैतिक संबंध असलेल्या विवाहित प्रेमीयुगुलाची काढली धिंड

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याती कोंढा गावात  अनैतिक संबंध असलेल्या विवाहित प्रेमीयुगुलाची धिंड काढण्यात आली. दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेचे गावातीलच पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. दोघांच्या संबंधांमुळे पुरुषाच्या घरात तणाव होता. त्यामुळे पुरुषाच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने या दोघांची धिंड काढल्याची माहिती आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या संबंधांची गेले काही दिवस गावात चर्चा होती. या संबंधांवरुन त्यांच्या नातेवाईकांनी असे न वागण्याबद्दल दोघांना समजावलेही होते. तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरुच होते. मात्र, रविवारी (२ डिसेंबर) ही महिला अचानक संबंधीत पुरुष व्यक्तिच्या घरी आली. तसेच, तिने आम्हाला पती-पत्नीप्रमाणे सोबत राहायचे आहे, असे सांगायला सुरुवात केली. त्यामुळे त्या पुरुषाचे नातलग प्रचंड संतापले आणि मोठा भाऊ, धाकटा भाऊ, त्यांची पत्नी, वडिलांनी त्या दोघांना हातगाडीच्या रिक्षात गावात धिंड काढली. दरम्यान, प्रकारानंतर संबंधीत पुरुषाने आढ्याळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.