मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

रिलेशनशिपमध्ये असल्यावर सोशल मीडियावर करू नये अशा चुका

आपण स्वीकार करत असाल वा नाही पण सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर अत्यंत प्रभाव पडत असतो. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यासाठी हा लेख आहे त्यातून त्यात रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी जे पर्सनल पोस्ट शेअर करत असतात. येथे आम्ही काही गोष्टी सांगत आहोत ज्या पोस्ट करणे टाळाव्या. 
 
सेक्स लाइफ 
आपली सेक्स लाइफ केवळ दोघांपुरेशी राहू द्या. दुनियेत याचा प्रचार करणे योग्य नाही. शेवटी इंटिमेट रिलेशन खाजगी राहू द्यावे.
 
पार्टनरची खाजगी माहिती
आपल्या पार्टनरच्या खाजगी सवयी, त्याची मानसिक किंवा शारीरिक आरोग्यासंबंधी समस्या, आर्थिक समस्या, कमजोरी, ताण इतर गोष्टींचा मीडियावर प्रचार टाळावा.
 
वाद-भांडण 
रिलेशनशिपमध्ये भांडण वाद होणे अगदी साहजिक आहे यात काळजी घेण्यासारखे किंवा पोस्ट टाकून सर्वांना सांगण्याची चूक करू नये. अशात वाद मिटणार नाही उलट ताण अधिक वाढेल.
 
खाजगी किंवा इंटिमेट फोटोज
पहिली गोष्ट म्हणजे असे फोटोज पोस्ट करू नये आणि करायची इच्छा असल्या पार्टनरची सहमती घेणे गरजेचे आहे.
 
थट्टा किंवा टीका
सोशल प्लॅटफॉमवर पार्टनरचा मजाक उडवणे योग्य नाही. आपलं रिलेशन कितीही मजबूत असलं तरी याचा आपल्या रिलेशनवर नकारात्मक प्रभाव नक्कीच पडू शकतो.
 
पार्टनर किंवा एक्ससंबंधी कमेंट
मूड खराब असलं तरी आपल्या पार्टनर किंवा पार्टनरच्या एक्ससंबंधी कोणत्याही प्रकाराचे नकारात्मक कमेंट्स टाळावे. आपल्या जीवनात काही अडचणी असू शकतात परंतू त्याचं समाधान सोशल प्लॅटफॉर्मावरून मिळणे शक्य नाही.