शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

महाशिवरात्री पूजन करण्यापूर्वी जाणून घ्या कामाची माहिती...चुकून महादेवाला हे अर्पित करू नये...

महादेवाची पूजा करताना अनेक अश्या वस्तू आहेत ज्या केवळ महादेवाला अर्पित केल्या जातात जसे- आक, बेळपत्र, भांग व इतर सामुग्री... परंतू काही अश्या वस्तू देखील आहेत ज्या महादेवाला चुकूनही अर्पित करू नये. अशा 6 वस्तू आहेत ज्या महादेवाच्या पूजेत वापरल्यास नुकसान झेलावं लागू शकतं. तर आज जाणून घ्या की कोणत्या अशा वस्तू आहे ज्यामुळे महादेव अप्रसन्न होऊ शकतात.
 
1. हळद 
आहारा सामील होणार्‍या हळदीला धार्मिक कार्यांमध्ये देखील महत्त्वाचे स्थान आहे. परंतू महादेवाच्या पिंडीवर हळद अर्पित केली जात नाही. तसेच शास्त्रांप्रमाणे शिवलिंग पुरुषत्वाचे प्रतीक आहे म्हणून वर्षातून केवळ एकदा म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी महादेवाला हळदी अर्पित करण्याची परंपरा आहे.
 
2. फुलं: महादेवाला कण्हेर आणि कमळाव्यतिरिक्त लाल रंगाचे फुलं प्रिय नाही. तसेच महादेवाला केतकी आणि केवडा फुले प्रतिबंधित आहेत.
 
3. कुंकू: शास्त्रांप्रमाणे महादेवाला कुंकू अर्पित केले जात नाही. पृथ्वीवर महादेव योग मुद्रेत राहतात म्हणून पिंडीवर किंवा महादेवाच्या प्रतिमेवर देखील कुंकू चढवत नाही. 
 
4. शंख: शंख भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे परंतू महादेवाने शंखचूर नामक असुराचे वध केले होते म्हणून शंख महादेवाच्या पूजेत वर्जित मानले गेले आहे.
 
5. नारळ पाणी: नारळ पाण्याने महादेवाला अभिषेक करू नये. नारळ लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे. आणि सर्व शुभ कार्यात नारळ प्रसाद रूपात ग्रहण केलं जातं. महादेवाला अर्पित केल्यावर नारळ किंवा नारळ पाणी पिण्यायोग्य राहत नाही. म्हणून महादेवाला नारळ अर्पित करू नये.
 
6. तुळस: तुळशीचे पान देखील महादेवाला अर्पित करू नये. या संदर्भात असुर राज जलंधराची कथा आहे ज्यांची पत्नी वृंदा तुळशीच्या झाडात परिवर्तित झाली होती. महादेवाने जलंधराचे वध केले होते म्हणून वृंदाने महादेवाच्या पूजेत तुळशीचे पान वापरू नये असे म्हटले होते.