1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (15:51 IST)

पिचडांनी पाप केले पक्षाने अनेक पद दिली तरीही पक्ष सोडला

नगर जिल्ह्यातील अकोले दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीने पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या भाबळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे, असा इशारा अजित पवारांनी पिचड पिता – पुत्रांना दिला आहे.यावेळी अजित पवार म्हणाले की, “भाजपसारख्या पक्षाचा पराभव करण्यासाठी एकविचाराचे सर्व एकत्र आले असून, राष्ट्रवादीतून राजे गेले, सेनापती गेले, नेतेही गेले. पण शरद पवार ठामपणे काम करत असून, १९९५-१९९९ मध्ये  युतीचं सरकार तेव्हा पिचडांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. मंत्रिपदे दिली, जि.प. अनेक पदे अकोलेत यांनाच दिली. तरीही पिचड गेले, मोठं पाप पिचडांनी केलं आहे. एकास एक उमेदवार देण्याच्या निर्णयावर ठाम राहा. आमिषाला बळी पडू नका. कार्यकर्त्यांना दमबाजी करु नका”, असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे. पुढे पवार म्हणाले की पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे.