testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

या महिला महापौरांना आली दाऊदची धमकी

daud abrahim
Last Modified गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (10:24 IST)
गुंड, देहासद्रोही व आतंकवादी असलेला दाऊद आपल्या देशातून कधीच पळून गेला आहे. मात्र त्याचा नावाचा वापर अजूनही अनेक नामचीन गुंड करतात आणि सामान्य माणसाला धमकी देतात. असाच प्रकार ठाणे येथे घडला आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना ठाण्याच्या महिला महापौर मिनाक्षी शिंदे यांना धमकीचा फोन आला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांच्या नावे हे फोन आले आहेत. या फोनद्वारे शिंदे यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन नुसार तुम्हाला कुटुंबात राहायचे आहे ना, तर व्यवस्थित राहा, ठाण्यात कोणाशीही पंगा घेऊ नका अशा पद्धतीने धमकावण्यात आले आहे. याबाबत मिनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महापौर शिंदे यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता, त्यांनी हा फोन उचलल्यानंतर तुम्ही मिनाक्षी शिंदे बोलता का असे विचारले. त्यावेळी मिनाक्षी यांनी हो, तुमचे काम काय असा प्रश्न विचारला. त्यानंतर फोन केलेल्या व्यक्तीने मी डोंगरीवरुन दाऊदचा माणूस बोलतो आहे असे सांगित
त्यांना म्हणाला की तुम्ही ठाण्यात खूप भांडणं करता. व्यवस्थित राहत नाही. यापुढे जर तुम्ही नीट राहिला नाहीत. तर तुम्हाला उचलून नेऊ, तुमच्या कुटुंबियांना त्रास देऊ अशी धमकी दिली. त्याशिवाय या पुढे नीट राहायचे अशी दमदाटीही या गुंडांकडून महापौरांना करण्यात आली. पोलिसांनी या गंभीर घटनेची लगेच नोंद घेतली असून, तपास सुरु केला आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

अयोध्या: रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात निकाल आल्यावर काय ...

अयोध्या: रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात निकाल आल्यावर काय होऊ शकतं?
अयोध्येतली पावणे तीन एकरांची ही जमीन हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाच्या लोकांच्या आस्थेचा ...

सावरकरांना ‘भारतरत्न’ म्हणजे शहिद भगतसिंग यांचा अपमान : ...

सावरकरांना ‘भारतरत्न’ म्हणजे शहिद भगतसिंग यांचा अपमान : कन्हैया कुमार
सावरकर यांना भारतरत्न देणं हा शहीद भगतसिंह यांचा अपमान आहे. अशा शब्दात भारतीय कम्युनिष्ट ...

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम
1813 : हिंदू संघटनांनी पहिल्यांदा दावा केला की 1528मध्ये बाबरचा सेनापती मीर बंकी यांनी ...

राहुल गांधी यांची सरकारवर टीका

राहुल गांधी यांची सरकारवर टीका
शेतकरी आत्महत्या, वाढलेली बेरोजगारी, पंजाब-महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यावर पंतप्रधान ...

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, ...

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, प्रकरणाचे गूढ वाढले
मुंबई येथे मोठी घटना समोर आली आहे. एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस ...