1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (09:32 IST)

एमआयएमचे मुंबईतील उमेदवार अखेर जाहीर

MIM candidate for Mumbai finally announced
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील आपल्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी स्वतः ट्विट करत घोषणा केली आहे. या आगोदर त्यांनी पुणे कँटोनमेंट, सांगोला, सोलापूर मध्य आणि दक्षिण या 4 मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केले होता. आता उमेदवार स्वतः ओवेसींनी दिल्याने वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीची शक्यता कमी झाली आहे. ओवेसी यांनी सोशल मीडियावर ट्विट केले त्यात कुर्ला, वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर, भायखळा, अंधेरी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. कुर्ल्यातून रत्नाकर ज्ञानू डावरे, वांद्रे पूर्वमधून मोहम्मद सलिम कुरेशी, अणुशक्तीनगरमधून शाहनवाज सरफराज शेख, भायखळामधून वारिस पठाण आणि अंधेरी (पश्चिम) येथून आरिफ मोईनुद्दीन शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.