शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (10:17 IST)

एमएमआरडीएने मोनो रेलची ५०० कोटींची चायनीज कंपनीची निविदा रद्द केली

मुंबईतील मोनो रेलसाठीची ५०० कोटींची चायनीज कंपनीची निविदा रद्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. एएमआरडीए प्रशासनाकडून १० मोनोरेलच्या रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना कंत्राट दिले जाणार होते. या दोन्ही चिनी कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. या चिनी कंपन्यांऐवजी BHELआणि BEML या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरु आहे.
 
मेक इन इंडिया सारखा उपक्रम आणि भारतीय कंपन्यांना चालना देण्यासाठी एमएमआरडीएनं हे कंत्राट चिनी कंपन्यांकडून काढून घेण्याचे ठरवले. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
मुंबई मेट्रोपॉलिटन रिझन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडूनमुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट रद्द केले आहेत. १० मोनोरेलच्या रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट अंतिम टप्प्यात होते. मात्र, दोन्ही चिनी कंपन्यांचे ते कंत्राट आता रद्द करण्यात आले आहेत.