सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (11:39 IST)

महत्त्वाची सूचना, रविवारी SBI ऑनलाइन बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. SBI ची ऑनलाइन सेवा 21 जून रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
 
काही अ‍ॅप्लिकेशन्सवर काम सुरू असल्यामुळे रविवारी 21 जून रोजी ऑनलाइन सेवेचा वापर करताना ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. , अशा आशयाचं ट्विट करत SBI ने याबाबत माहिती दिली आहे.
 
ग्राहकांनी ऑनलाइन सेवेशी निगडित कामं आधीच करुन घ्यावीत असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.