1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Govinda restaurant Hero no 1 in uttar pradesh

निराश गोविंदा आता सुरू करणार हा व्यवसाय

गोविंदा सुरू करणार रेस्टॉरन्ट
90 दशकात बॉक्स ऑफिसवर कमाल करणारे गोविंदा बदलत्या काळाप्रमाणे स्वत:ला बदलू शकले नाही आणि त्याचा करिअरला ब्रेक लागला. गोविंदाने खूप प्रयत्न केला पण यश काही हाती लागले नाही.
 
गोविंदाचा एक चित्रपट 'आ गया तेरा हिरो' तीन मार्चला प्रदर्शित होत आहे, परंतू गोविंदा जी गोष्ट जाणून आहे की आता त्याच्या सिनेसृष्टीतील करिअर संपले म्हणून त्याने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
दिल्लीच्या एका समूहाशी पार्टनरशिपमध्ये गोविंदा उत्तर प्रदेशात रेस्टॉरन्टची शृंखला सुरू करत आहे. हीरो नं. 1 असे या रेस्टॉरन्टचे नाव असेल. हे गोविंदाच्या एका चित्रपटाचे नाव आहे. गोविंदाची नं.1 लागलेल्या सर्व चित्रपट हिट राहिल्या होत्या म्हणून या लकी फेक्टरमुळे गोविंदाने रेस्टॉरन्टमध्येही नं. 1 जोडून दिले असेल.
पुढील लेख
जगभरात ‘रईस’ची २१५.७ कोटींची कमाई