1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Raees box office collection

जगभरात ‘रईस’ची २१५.७ कोटींची कमाई

रईस  २१५.७ कोटी कमाई
जगभरात ‘रईस’ने २१५.७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात १०९.०१ कोटींची कमाई केली आहे. व्यापाऱ समिक्षक रमेश बाला यांनी केलेल्या ट्विटनुसार, १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा शाहरुखचा हा सातवा चित्रपट आहे.

या चित्रपटाने अजय देवगण आणि अक्षय कुमारलाही मागे टाकले आहे. या दोन्ही कलाकारांचे १०० कोटींच्या क्लबमध्ये सहा चित्रपट आहेत.‘रईस’ने सोमवारी (३० जानेवारी) ८.२५ कोटी आणि मंगळवारी (३१ जानेवारी) ७.५२ कोटी कमविले. भारतात चित्रपटाची निव्वळ कमाई – १०९ कोटी तर एकूण कमाई – १५१.४ कोटी इतकी आहे. 
पुढील लेख
डॉ. निलेश साबळे काही आठवडे विश्रांती घेणार