1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
  4. Patalpani Waterfall Indore Madhya

पातालपानी इंदौरच्या आसपासचा एक छुपा रत्न; मॉन्सूनमध्ये जरूर भेट द्या!

Patalpani Indore
India Tourism : पातालपानी हे मध्य प्रदेशातील इंदूर जवळील एक अत्यंत प्रसिद्ध, निसर्गरम्य आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे प्रामुख्याने तिथल्या विहंगम धबधब्यासाठी ओळखले जाते. जर तुम्ही इंदूरला भेट देणार असाल किंवा ट्रेकिंग आणि निसर्गाचे शौकीन असाल, तर पातालपानीला नक्की भेट दिली पाहिजे. या स्थळाबद्दलची महत्त्वाची आणि रंजक माहिती आज आपण पाहणार आहोत. 

पातालपानी धबधबा

हा धबधबा साधारण ३०० फूट उंचीवरून खाली दरीत कोसळतो.पातालपानी इंदौर जिल्ह्यातील महू तहसीलएक सुंदर आणि लोकप्रिय जलप्रपात आहे. चोरल नदीवर (नर्मदा उपनदी) असलेला हा धबधबा सुमारे ९०-९१ मीटर (३०० फूट) उंच आहे. आजूबाजूला असलेली घनदाट झाडी, डोंगर आणि दऱ्यांमुळे येथील परिसर अत्यंत नयनरम्य दिसतो. पावसाळ्यात हा धबधबा पूर्ण वेगाने वाहतो, तेव्हा त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.
 

'पातालपानी' नावामागची आख्यायिका

स्थानिक मान्यतेनुसार, या धबधब्याच्या तळाशी जी कुंड (दरी) आहे, ती इतकी खोल आहे की तिचे पाणी थेट 'पाताळात' जाते. त्याच्या खोलीचा अचूक अंदाज कोणालाही लावता आलेला नाही, म्हणूनच या जागेला 'पातालपानी' असे नाव पडले.
 

तांत्या भील यांचे समाधी स्थळ

पातालपानीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. भारताचे 'रॉबिनहुड' मानले जाणारे महान आदिवासी क्रांतिकारक टंट्या मामा (तांत्या भील) यांचे हे कर्मस्थान होते. येथे त्यांची समाधी आणि एक मंदिर आहे. असे म्हटले जाते की, येथून रेल्वे जाताना टंट्या मामांच्या सन्मानार्थ ट्रेनचा हॉर्न नक्की वाजवला जातो आणि ट्रेन काही सेकंदांसाठी थांबवली जाते.

भेट देण्याचा सर्वोत्तम काळ

पावसाळा (जुलै ते ऑक्टोबर) हा काळ पातालपानीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवसांत आजूबाजूचा परिसर हिरवागार होतो आणि धबधबा पूर्ण वैभवात असतो.
पावसाळ्यात धबधब्याच्या अगदी जवळ जाणे किंवा पाण्यात उतरणे धोक्याचे असते, कारण येथे अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो.
 

पातालपानी इंदूर जावे कसे? 

पातालपानी हे मध्य प्रदेशातील इंदूर मुख्य शहरापासून साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर, महू तहसीलजवळ आहे. इंदूरहून तुम्ही टॅक्सी, स्वतःची कार किंवा बाइकने सहज जाऊ शकता. तसेच इंदूर-महू दरम्यान चालणारी 'हेरिटेज ट्रेन' देखील पातालपानी रेल्वे स्थानकावरून जाते, ज्यातून प्रवास करण्याचा अनुभव खूप सुंदर असतो.
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा