प्युअर व्हेजिटेरियन झाली सनी!
डॉक्टरांनी दारु, मांसाहार, डेअरी पदार्थ आणि मसालेदार खाद्य पदार्थापासून अभिनेत्री सनी लिओनला दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मला बरे वाटत नाही, माझे रक्त इन्फेक्शनपासून शुध्द करण्याची गरज आहे आणि शरीरात उष्णताही वाढली असल्याचे सनीने सांगितले.
सॅड मॉर्निग! माझ्या चायनिज डॉक्टरांनी कॅफेन, अल्कोहोल, डेअरी पदार्थ आणि मटन आणि मसालेदार पदार्थ सेवन करण्यास मनाई केली असल्याचे सनीने म्हटले आहे. सनी लिओन पारंपरिक चायनिज औषधोपचार घेत असते.
अलीकडेच सनी लिओनचा ‘बेईमान लव्ह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. राजीव चौधरी यांनी याचे दिग्दर्शन केले होते. यात राजेश दुग्गलची प्रमुख भूमिका होती.
