1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. अण्णा हजरेंच्या जीवनावर चित्रपट

अण्णा हजरेंच्या जीवनावर चित्रपट

तनिशा मुखर्जी आता लवकरच एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनचरित्रावर आधारलेला असून तनिशा या चित्रपटात एका बिनधास्त पत्रकाराची भूमिका साकारत आहे. 
 
जिच्यासाठी बातमी म्हणजे पैसे कमवण्याचे साधन आहे. या चित्रपटाची सुरुवात 2011 सालातील अण्णांनी केलेल्या रामलीला मैदान आंदोलनापासून होते आणि या आंदोलनामधील अण्णांचे योगदान, राजकीय परिस्थितीचे नाट्य, देशातील समकालीन लोकशाहीवादी परिस्थिती आणि त्यामुळे झालेले लोकांच जीवनातील मूलभूत बदल याचे भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात अण्णा हजारेंची भूमिका शशांक उदापूरकर करणार आहेत, ज्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 
 
नील अँन्ड निक्की चित्रपटातून नावारूपाला आलेली तनिशा या चित्रपटात अगदी वेगळ्या रूपात दिसून येणार आहे. तनिशा तिच या चित्रपटातील भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे. बिंग बॉसमधील विवादामुळे चर्चेत असलेली तनिशा आता तिच या आगामी चित्रपटामधील भूमिकेवर भर देऊन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री घेण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे.