अमिषा पटेलद्वारे राष्ट्रगीताचा अपमान
मुंबई- बॉलीवूड तारका अमिषा पटेलने राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप बिग बॉसमधील माजी स्पर्धक कुशल टंडन याने केला आहे.
ट्विटरवर त्याने एक घटना स्पष्ट केली आहे. एक कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना उपस्थित सर्व लोक उभे होते, मात्र एक मुलगी मोबाइलसोबत चाळे करताना दिसत होती. आधी मला वाटले की ती अपंग असावी नंतर लक्षात आले की ती अमिषा पटेल आहे, अशी माहिती टंडन याने दिली आहे.
