1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. आई होणार आहे जॅकलिन!

आई होणार आहे जॅकलिन!

jaklin
हे काय, शीर्षक वाचून तुमची झोप नक्की उडाली असेल, लाखो तरुणांच्या दिलाची धडकन आई होणार आहे. पण तसे काही नाही आहे. तर ती तिच्या आगामी चित्रपटात आईची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस ‘किक’ चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तिला बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होण्यास सलमानने मदत केली आहे हे तर सर्वानाच माहीत आहे. पण आता सलमानच्या सांगण्यावरून जॅकलीन चित्रपटात आईची भूमिका करण्यासही तयार झाली आहे. आगामी ब्रदर्स या चित्रपटात जॅकलिन अक्षयकुमारच्या पत्नीची भूमिका करत आहे. यात त्यांना एक लहान मुलगीही दाखवण्यात आली आहे.

एका मुलाखतीदरम्यान जॅकलिनने सांगितले की, सलमानचे तिच्या आयुष्यात वेगळे असे स्थान आहे. सलमानने सांगितलेल्या सल्ल्यावर ती डोळे बंद करुन विश्वास करते, असेही जॅकलिन म्हणते.