1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. ..आणि अनुष्कानं विराटला मिठी मारली! (पहा फोटो)

..आणि अनुष्कानं विराटला मिठी मारली! (पहा फोटो)

वोग इंडिया बयुटी अवॉर्ड्स 2015
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘वोग इंडिया ब्युटी अँवॉर्डस् 2015’च्या निमित्तानं अनुष्का शर्मा पहिल्यांदाच विराट कोहलीसोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसली. हे लव्हबर्डस् या कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं. यावेळी, अनुष्काला ‘ब्युटी ऑफ द इअर’चा अँवॉर्ड दिला गेला. विराट आपल्या लेडी लव्हला सपोर्ट करण्यासाठी इथं दाखल झाला होता. यावेळी, अनुष्कानं गौरी-नैनिकाचा लेमन कलरचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.. सोबत विराटही होता. यामुळे तिचं तेज जास्तच खुलून दिसत होतं. यावेळी, विराटनं तुला कसं कॉम्प्लिमेंट केलं? असा प्रश्न अनुष्काला विचारला गेला तेव्हा तर तिला आपलं हसू आवरण कठीण गेलं.. ‘तू आज लिंबूसारखी दिसतेयस असं आज विराटनं मला म्हटलं’ असं सांगताना ती खळखळून हसली. या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत येण्यासाठी अनुष्कानं विराटला अनोख्या पद्धतीनं थँक्स म्हटलं. यावेळी, तिनं विराटला दोन्ही हातांमध्ये घेत घट्ट मिठी मारली. सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच अनुष्कानं आपलं विराटवरचं प्रेम असं व्यक्त केलं असेल.