1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2015 (12:14 IST)

कलामांच्या भूमिकेसाठी अमिताभच हवा

amitabh bachhan
आय अँम कलाम या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या लघुपटाच्या दिग्दर्शक नीला पांडा यांनी माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांची स्मृती आपल्या जीवनात चिरंतन राहावी यासाठी कलामांच्या जीवनावर बायोपिक बनविण्याचा निर्णय घेतला असून यात कलाम यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारावी अशी त्यांची इच्छाही बोलून दाखविली आहे. अब्दुल कलाम आज आपल्यामध्ये नाहीत मात्र त्यांचा संदेश पुढे नेणे फार महत्त्वाचे आहे असे सांगून नीला पांडा म्हणाल्या कलामांच्या जीवनावर चित्रपट बनविताना पूर्ण अभ्यास करूनच बनविला जाईल. त्यासाठी एखाद्या विद्वान व्यक्तीची नेमणूकही केली जाईल जी कलामांविषयीची सत्य माहिती देऊ शकेल. ही भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारावी कारण केवळ तेच या भूमिकेला न्याय देऊ शकतील. त्यासाठी त्यांच्याशी लवकरच संपर्क साधणार असल्याचेही पांडा यांनी सांगितले. विशेष म्हणजे बॉलिवूडचा हा महानायक आणि देशाचे महानायक एपीजे अब्दुल कलाम प्रत्यक्षात एकदाही एकमेकांना भेटलेले नाहीत.