1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 24 ऑक्टोबर 2015 (11:11 IST)

गायक अभिजीतवर छेडखानीचा गुन्हा

abhijit
गायक अभि‍जीत भट्टाचार्य विरोधात एका महिलेने छेडखानीची तक्रार दाखल केली आहे. वर्सोवामधील लोखंडवाला दुर्गा मंडपात आलेल्या एका महिलेने ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित 34 वर्षीय महिला ही गायक कैलाश खेर यांच्या कार्यक्रम पाहण्यासाठी येथील मंडळात आली होती. गर्दी असल्याने संबंधित महिला स्वत:ची सीट सोडून उभी राहून कार्यक्रम पाहत होती तेव्हा तिच्या शेजारी उभ्या असणार्‍या अभिजीनने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. महिलेने अभिजीतचा विरोध केला, तेव्हा त्याने जाहीरपणे तिला शिवीगाळ केली.