भूमी पेडणेकर सडपातळ मुलीच्या भूमिकेत झळकणार!
‘दम लगाके हयशा’ या चित्रपटात अतिशय जाड मुलीची भूमिका भूमी पेडणेकरने साकारली होती. त्यामुळे ती खूप जाड आहे आणि अशाच भूमिका तिला मिळतील असे वाटत असताना आगामी चित्रपटात भूमी सडपातळ मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. या वर्षी यशराज फिल्मच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून भूमीने पदार्पण केले होते.
पहिल्या चित्रपटात ती आयुष्यमान खुराणाची नायिका बनली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि तिकीटबारीवरही चांगला चालला. या चित्रपटासाठी भूमीने आपले वजन 15 किलोने वाढवले होते. आता हे वजन कमी करणे तिला कठीण जात असून मी आगामी चित्रपटासाठी वजन कमी करीत आहे, याचा तपशील मी आताच देऊ शकणार नाही. पण ‘दम लगा के हयशा’ चित्रपटापेक्षा ही भूमिका वेगळी असणार आहे असे ती म्हणाली.