1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. मधुबालाला कोण म्हणायचं बंदरिया

मधुबालाला कोण म्हणायचं बंदरिया

मधुबाला बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. तिच्या सौंदर्यांवर बोलायला शब्द कमी पडत होते, पण एक व्यक्ती अशी ही होती जी मधुबाला हिला बंदरिया म्हणून हाक मारायची.
 
हे जनाब अजून कोणी नव्हे तर तिचे पती किशोर कुमार होते. मधुबाला मुंबईत बांद्रा येथे राहत होती. आपल्या स्वभावाप्रमाणेच बांद्रा हा शब्द ऐकून किशोरला बंदर अर्थात माकड आठवायचा आणि म्हणूनच किशोर मधुबाला हिला बांद्री किंवा बंदरिया अशी हाक मारायचे.