1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 16 सप्टेंबर 2015 (11:39 IST)

मिया खलिफाला ‘बिग बॉस-9’मध्ये एंट्री?

सनी लिऑन
बिग बॉसच्या नवव्या सीझनमध्ये आणखी एका पॉर्न स्टारला एंट्री मिळू शकते. पॉर्न स्टार मिया खलिफा यावेळी बिग बॉसच्या घरात दिसू शकेल. मिळालेल्या बातमीनुसार चॅनेलने तिला अँप्रोच केलंय. मिया खलिफा सुद्धा बिग बॉसमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं कळतंय. मिया खलिफा जर ‘बिग बॉस’च्या घरात येत असेल तर अशी करणारी ती पहिली पॉर्न स्टार नसेल. यापूर्वी बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये कॅनेडियन पॉर्न स्टार सनी लिऑन बिग बॉसच्या घरात आली होती. सनी लिऑनसाठी बिग बॉस खूप लकी ठरलं आणि या शोमुळेच तिला बॉलीवूडमध्ये एंट्री मिळाली.
 
लेबनानमध्ये जन्मलेली मिया आता 22 वर्षाची आहे आणि सध्या ती मियामी इथं राहते. जर ती सुरुवातीपासून या शोमध्ये नसेल तर तिची वाईल्ड कार्ड एंट्री होऊ शकते. ‘बिग बॉस’च्या वेळेस प्रेक्षकांनी सनी लिऑनला पसंत केलं होतं आणि चॅनेलला अपेक्षा आहे की, मिया 
 
खलिफालाही प्रेक्षक पसंत करतील. दरम्यान बिग बॉसकडून अद्याप याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही. यंदाही सलमान खान शोचं होस्टिंग करणार आहे.