1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2015 (11:47 IST)

राखी सावंतला सनीचे सडेतोड उत्तर

sunney leon
अभिनेत्री सनी लिओनने आपली फिटनेस डिव्हिडी ‘सुपर हॉट सनी मॉर्निग्स’ लाँच केली आहे. मलाडच्या इनॉरबिट मॉलमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये सनी पती डेनिअल वेबरसोबत उपस्थित होती. यावेळी तिने शानदार बॉडी बनवण्याचे सिक्रेटस् शेअर केले आहेत. 
 
इव्हेंटदरम्यान डिझाइनर विधी वाधवानीच्या ब्लू आऊटफिटस्मध्ये दिसली. सनी लिओनने तिचा तिरस्कार करणार्‍या लोकांनासुध्दा सडेतोड उत्तर दिले.
 
‘आनंदी आहे लोक माझ्याविषयी बोलतात’ कॉन्ट्राव्हर्शिअल क्वीन राखी सावंत नेहमी सनीविषयी वादग्रस्त वक्तव्य देताना दिसते. तिने सनीला बॅन करण्याचीसुध्दा मागणी केली होती. इव्हेंटदरम्यान जेव्हा राखीच्या प्रतिक्रियेवर सनीला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले, ‘लोक नेहमी माझ्याविषयी वाईट बोलतात. 
 
मात्र आपण याविषयी सकारात्मक विचार करावा. लोक आपल्याविषयी बोलतात हा विचार करून आनंदी राहावे. माझ्या आजूबाजूला अनेक सकारात्मक लोक राहतात, ते मला ऊर्जा देतात.’ डिव्हिडी लाँचवेळी सनीने सांगितले, की बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त फिट प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन आहेत. मात्र सनीने असेही सांगितले, की आजचे सर्व सेलेब्स फिटनेसवर लक्ष देतात.