1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. रोमँटिक सीन देण्यास राधिकाला अडचण

रोमँटिक सीन देण्यास राधिकाला अडचण

केतन मेहताचा ‘मांझी-द माउंटेन मैन’ या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना, अभिनेत्री राधिका आपटेला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमँटिक दृश्य देतांना अडचण येत आहे. कारण राधिका आपटेला वाटतंय, नवाझुद्दीन सिद्दीकीला आपण आवडत नाही, कारण नवाझुद्दीन राधिकाशी बोलतही नाही. राधिका म्हणते, सिनेमात नवाझुद्दीनशी प्रेम करणं फारच कठीण होऊन बसलं होतं, कारण जेव्हा शूटिंग असेल आणि रोमँटिक सीन असेल तेव्हा, नवाझुद्दीन शांत शांत राहत होता. राधिकाने दिग्दर्शक केतन मेहता यांनाही सांगितलं की, नवाझुद्दीनला मी हिरोईन म्हणून आवडत नाही का, ते माझ्याशी बोलत का नाही, तो एवढा काय शांत माणूस आहे. मात्र केतन मेहता म्हणतात, जेव्हा अँक्शन म्हटलं जात असे, तेव्हा नवाझुद्दीनमधील रोमॅँटिक अंदाज तुम्हाला आपोआप पाहायला मिळेल. नवाझुद्दीन गंमत करताना म्हणाला, जर राधिकासारखी अभिनेत्री असेल, तर मला रोमँटिक सीन करायला आवडेल आणि ज्या दिवशी शूटिंगमध्ये राधिकाचं काम नसेल, त्याही दिवशी मी दिग्दर्शकाला सांगेन, की राधिकांना बोलवा ‘मांझी-द माउंटेन मैन’ हा सिनेमा 21 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.