1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2015 (10:39 IST)

लारा दत्ता घेणार ‘मिस दिवा 2015’चा शोध

लारा दत्ता
सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा अप्रतिम मिलाफ असलेल्या युवतींचा शोध घेणार्‍या ‘यामाहा फॅसिनो मिस दिवा 2015’ या सौंदर्य स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू झाले आहे. छोट्या पडद्यावर गेल्या वर्षीच याचे दमदार पदार्पण झाले.

यावर्षीच्या मालिकेचे सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन ‘मिस युनिव्हर्स 2000’ लारा दत्ता करणार आहे.
 
यंदाची सौंदर्य स्पर्धा रॉक स्टार गेविन मिग्यूअल, राकेश अगरवाल, रोहित गांधी, राहुल खन्ना, निधी मुनीम, कोमल सूद अशा अनेक मान्यवर नावांशी जोडली गेली आहे.