विराट-अनुष्का राहणार एकत्र?
टीम इंडियाचा दमदार बॅट्समन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा.. या लव्हबर्डस्ची प्रेमकहानी तर आपल्याला माहितीच आहे. दोघंही प्रेमात आकंठ बुडालेत.. वेळोवेळी ते त्यांनी कबूलही केलंय.
नुकतंच त्यांच्यात काही ठीक नसल्याची चर्चा होती. लग्नच्या निर्णयावरून दोघांमध्ये भांडण होत असल्याचं बोललं जात होतं. पण वानखेडे स्टेडियमवर अखेरच्या वनडे मॅचमध्ये असलेली अनुष्काची उपस्थिती काही तरी वेगळंच सांगून जाते.
आता हे दोघं एकत्र राहणार असल्याची चर्चा आहे. वरळीमधील एका इमारतीत फ्लॅट बुक करून एकत्र राहण्याचं दोघांनी ठरवल्याचं कळतंय.
यापूर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे सुद्धा एकत्र राहात आहेत. आता तसाच निर्णय विराट-अनुष्कानं घेतलाय का? हे आगामी काळ स्पष्ट करेल.