शॉटगन यांचे ‘बजरंगी भाईजान’ला समर्थन
‘बजरंगी भाईजान’च्या समर्थनासाठी आता भाजपचे खासदार आणि शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पुढे झाले आहेत. काही हिंदुत्ववादी संघटना सलमान खानच्या आगामी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करीत असून त्यांचा हा विरोध केवळ विरोधासाठी असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांना वाटते.
चित्रपट न पाहाताच त्याला विरोध करणे मला चुकीचे वाटते. मी आणि सलमान कौटुंबिक मित्र आहोत. मीही अजून चित्रपट पाहिलेला नाही मग विरोध कोणत्या कारणांसाठी करायचा, असा सवाल शत्रुघ्न सिन्हा यांनी चित्रपटाच्या समर्थनार्थ बोलताना केला.
हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. हा चित्रपट अलीकडच्या काळातील सर्वात धङ्र्कनिरपेक्ष विषय असल्याचे मला कळलेले आहे. त्यातून समाजातील ऐक्याची भावना वाढीस लागेल अशीच अपेक्षा असल्यामुळे लोकांनी त्याला विरोध करणे सोडून द्यावे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट संमत केला आहे. त्यात काही आक्षेपार्ह असते तर त्यांनी अडवले असते, असे रोखठोक मत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.