संजयची ‘जज्बा’च्या सेटवर हजेरी
ऐश्वर्या राय, इरफान खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जज्बा’ चित्रपटाच्या सेटवर संजय दत्तने हजेरी लावली. त्यावेळी दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्यासह चित्रपटाचा क्रूही भावनाविवश झाला.
संजय दत्तने गुप्ता यांच्यासोबत कांटे, जिंदा, जंगसारखे चित्रपट केले आहेत. संजय गुप्तांच्या मनात या चित्रपटांच्या आठवणी जाग्या झाल्या. संजय दत्त मुलीच्या नाकपुडीच्या उपचारांसाठी 30 दिवसांच्या पॅरोलवर आहे.
1993 च्या बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्र बाळगल्यानं संजयला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 42 महिन्यांपासून तो पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगतो आहे. 1993 मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. त्यानंतर, मे 2013 ते मे 2014 या वर्षभरात तो तब्बल 118 दिवस पॅरोल आणि फलरेच्या रजेवर तुरुंगाबाहेर राहिला. प्रथम वैद्यकीय कारणांमुळे ऑक्टोबर 2013 मध्ये 28 दिवसांची सुटी देण्यात आली होती. त्यानंतर पत्नी आजारी असल्याने त्याला डिसेंबर 2013 मध्ये पुन्हा 28 दिवसांची रजा मिळाली होती. त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये त्याला 28 दिवसांची आणखी रजा वाढवून देण्यात आली. त्यानंतर संजय दत्तने चार डिसेंबर रोजी तुरुंग प्रशासनाकडे संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता. अखेर 24 डिसेंबरला त्याला 14 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. संचित रजा पूर्ण होऊनही संजय दत्त परत न आल्याने वादळ उठलं होतं. आता पुन्हा त्याला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.