1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2015 (12:01 IST)

सलमा हायेकचे टॉपलेस फोटो शूट!

salman hayak
वयाच्या विचाराने पन्नाशीत प्रवेश करणारी अभिनेत्री मॉडेल सलमा हायेक हादरली होती. तिने ‘अलुर’ या मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी या वयातही टॉपलेस फोटो सेशन केल्यानंतर ‘अजून यौवनात मी’चा साक्षात्कार तिला झाला आहे. मी माझे वय झाल्यानंतर कशी दिसेन, याचा विचार जेव्हा माझ्या मनात यायचा, तेव्हा मी हादरुन जात असे. मला म्हातारे झाल्याचा भास व्हायचा. पण आता मी स्वत:कडे पाहाते, तेव्हा मला समाधान वाटते. आताच्या माझ्या दिसण्यावर मी खूश असल्याचे सलमा म्हणाली.

महिलांना आपण अनेक पिढय़ांपासून पन्नाशीनंतर उतरतीला लागतो असे वाटते. पन्नाशीच्या भयाने त्यांना ग्रासलेले असते. पन्नाशीनंतर सगळे संपते असा समज माझा झाला होता, असेही ती म्हणाली.