गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 ऑक्टोबर 2015 (18:25 IST)

सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ची कथा चोरीची?

बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा आगामी चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ एक इंग्रजी कादंबरी ‘द प्रिजनर ऑफ जेंडा’चं बॉलीवूड व्हर्जन असल्याचं बोललं जातंय. 1984 मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी अँथनी होप यांनी लिहिलीय.
 
यापूर्वी 1937, 1952 आणि 1979 मध्ये या विषयावर चित्रपट झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सूरज बडजात्या यांचा ‘प्रेम रतन धन पायो’ या कादंबरी सारखा वाटतोय. ‘द प्रिजनर..’ची कथा ही अशा राजकुमाराची आहे ज्याला त्याच्यासारख्याच दिसणार्‍या व्यक्तीसोबत बदललं जातं आणि नंतर तो राजकुमाराच्या सावत्र भावाचा राजकुमाराची संपत्ती हडपण्याचा कट हाणून पाडतो. 
 
अशी आहे कथा
सूत्रांनुसार सलमानच्या चित्रपटाची कथासुद्धा हीच आहे. यात प्रिंस विजय आणि प्रेम (सलमान) एकाच चेहर्‍याचे आहेत. विजय आपली बहीण (स्वरा भास्कर) आणि भाऊ निरंजन (नील नितीन मुकेश)वर खूप प्रेम करतो. चित्रपटात अनुपम खेर विजयच्या जागी प्रेमला घेऊन येतात जेणेकरून निरंजनच्या कटाची माहिती मिळावी. तिथं प्रेम मैथिली म्हणजे सोनमच्या प्रेमात पडतो. विजयची बहीण पहिले निरंजनला साथ देते पण नंतर ती सगळं खरं सांगते आणि प्रेम तिला वाचवतो. कथेत थोडा फार बदल असू शकतो, पण ही कथा ‘द प्रिजनर..’मधूनच घेतली गेलीय.