1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. ‘तमाशा’मुळे कॅटरिना अस्वस्थ?

‘तमाशा’मुळे कॅटरिना अस्वस्थ?

आगामी ‘तमाशा’ चित्रपटातून दीपिका पदुकोण-रणवीर कपूरची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रीअल लाईफमध्ये ही जोडी फार काळ एकत्र राहू शकली नसली तरी, रील लाईफमध्ये मात्र प्रेक्षकांना ही जोडी प्रचंड भावते. पडद्यावर या दोघांची जुळणारी केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. 
 
‘तमाशा’ आधी आलेला रणवीर-दीपिका जोडीचा ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपट तुफान हिट ठरला होता. 
 
दीपिका-रणवीरची जोडी प्रेक्षकांना आवडत असली तरी, यामुळे एक व्यक्ती अस्वस्थ होत असेल ती म्हणजे कॅटरिना कैफ. तमाशाची प्रसिध्दी सुरु झाल्यापासून माध्यमांमध्ये कॅटरिना असुरक्षित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण कॅटरिनाबरोबर रिलेशनशिप असलेला रणवीर कधीकाळी दीपिकाच्या प्रेमात होता. 
 
माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चेवर बरेच दिवस गप्प राहिल्यानंतर कॅटरिनाला यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ती म्हणाली की, मी चित्रपटाची दिग्दर्शक नाही. मी कलाकारांकडे या दृष्टीने पाहात नाही. प्रत्येकाला दुसर्‍या व्यक्तीबरोबर काम करण्याचे स्वातंर्त्य आहे. खरोखरच कॅटरिना हे मनापासून बोलली की, तिच्या मनात धाकधूक आहे हे तिलाच ठाऊक.