1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. ‘बजरंगी भाईजान’ने मोडला ‘धूम 3’चा विक्रम

‘बजरंगी भाईजान’ने मोडला ‘धूम 3’चा विक्रम

सलमान खान
दबंग अभिनेता सलमान खान याची ओळख बदलवणार्‍या आणि ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ने बॉक्स ऑफिसवर धमाल करत मिस्टर परफेक्शनिस्टच्या ‘धूम 3’चे रेकॉर्डही मोडीत काढले आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या बजरंगी भाईजानने नवे रेकॉर्ड नोंदवत आमिर खानच्या धूम 3 ला ओव्हरटेक करत तब्बल 16 दिवसात 283.16 कोटींचा गल्ला जमा केला आहे.
 
आता देशांतरांगत कमाईमध्ये बजरंगीच पुढे आमिरच्या पीके चित्रपटाचे रेकॉर्ड आहे. कारण पीकेने भारतात 339 कोटींची कमाई केली आहे. 2013 मध्ये रिलीज झालेल्या धूम 3 ने भारतात 280 कोटींचा गल्ला जमा करून सर्वात अधिक कमाईचे रेकॉर्ड केले होते. हे रेकॉर्ड बजरंगी भाईजानने मोडीत काढले असून प्रदर्शनाच 19 व दिवशी 300 करोडचा टप्पा पार केल्या असल्याचे आदर्श यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. धूम 3 ने देशात पहिल्याच आठवड्यात 184.62 कोटी आणि दुसर्‍या आठवड्यात 88 कोटी कमाई केली होती तर बजरंगी भाईजानने प्रदर्शनाच पहिल्या दिवशी 4.11 कोटी दुसर्‍या दिवशी 6.80 कोटी रूपायांची कमाई केली.