1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...
Written By वेबदुनिया|

अमीर खानचा सल्ला घेत नाही - इमरान

अमीर खानचा सल्ला इमरान
IFMIFM
‘जाने तू... या जाने ना’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात युवक-युवतींची धडकन बनलेला इमरान खान आता ‘किडनॅप’ या चित्रपटातून खतरनाक व्यक्तीच्या भूमिकेतून येत आहे. या चित्रपटाप्रती तो कमालीचा उत्साहित आहे. आपले चाहते आपणास या भूमिकेत पसंत करतील, असा त्याला पक्का विश्वास आहे. ही भूमिकाच काय तर कोणतेही काम करताना आपले मामा अमीर खान यांचा सल्ला घेत नसल्याचे तो सांगतो. त्याच्याशी केलेली ही बातचीत....



पहिल्या चित्रपटात लव्हर बॉयची भूमिका केल्यानंतर किडनॅपरची भूमिका करण्याचा निर्णय कसा घेतलास?
सगळ्या चित्रपटात एकसारख्याच भूमिका करण्याची मी शपथ घेतलेली नाही. प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करणार आहे. ‘जाने तू... या जाने ना’ प्रदर्शित झाला होता तेव्हाच 'किडनॅप' साठी साईन केले होते. खरेतर ‘जाने तू... ’ मधील भूमिकेत मी समरस झालो होतो तसा ‘किडनॅप’ मध्ये होऊ शकणार नाही. संजय गढवी यांनी मला या भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा ती, मी करू शकेन की नाही
याबाबत मलाच आत्मविश्वास नव्हता. पण, संजय यांनी मनोबल वाढवले.

IFMIFM
‘किडनॅप’ या चित्रपटात तुला संधी कशी मिळाली?
निर्माता ढिलीन मेहता यांनी एकदिवस संजय गढवी यांच्याशी माझी भेट घालून दिली. मला पाहिल्यावर मी कबीरच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे त्यांना वाटले आणि त्यांनी मला संधी दिली. पण, यासाठी मला तीन वेळा स्क्रीन टेस्ट द्यावी लागली.


‘किडनॅप’ साइन करण्यापूर्वी तू मामा (अमीर खान) ची चर्चा केली होतीस?
नाही. आणि मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो की, माझ्या करियर बाबतीत मी मामकडून कोणताही सल्ला घेत नाही. खरे सांगायचे झाले तर मी त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही. आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मी ‘लक’ हा तिसरा चित्रपट करत आहे, याची त्यांना कल्पनाही नाही.

‘किडनॅप’ मधील तुझ्या भूमिकेबद्दल थोडे सांगशील?
मी कबीरची भूमिका करत आहे. करोडपती विक्रांत रैना (संजय दत्त) ची मुलगी सोनिया (मिनिषा लांबा) चे तो अपहरण करतो. कबीर हा नाराज आणि खतरनाक विचारांचा युवक आहे. कबीर एकदम वेगळा दिसला पाहिजे अशी संजय गढवी यांची अपेक्षा होती. यासाठी माझ्या चेह-याला ब्लॅक शेड देण्यात आली आहे. हेअर स्टाइलपण वेगळी आहे. चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.


IFMIFM
या भूमिकेसाठी विशेष तयारी केलीस का?
दिग्दर्शक संजय यांनी मला व मिनिषा लांबाला घेऊन तीन आठवड्यांचे वर्कशॉप घेतले. दिवसातून चार-पाच तास आम्ही तालीम करीत होतो. यामुळे आम्हाला नेमके काय करायचे आहे, हे लक्षात आले.


संजय गढवी यांचे दिग्दर्शन कसे वाटले?
ते अनुभवी आहेत. त्यांना टेक्नॉलॉजीचा चांगला अनुभव आहे. सेटवा येताना ते परीपूर्ण माहिती घेऊनच येतात. कोणते दृश्य कोणत्या अॅगलने घ्यायचे आहे, हे त्यांना माहित असते.

मिनिषाच्या बाबतीत काय सांगशील?
मिनिषाचा ‘यहॉ’ हा चित्रपट मी पाहिला आहे. मला ‍ितचा अभिनय फार आवडला. तेव्हाच मी ठरवले की, तिच्याबरोबर नक्कीच काम करणार. या चित्रपटात ती माझ्याबरोबर आहे असे कळताच मी खुश झाले. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.

संजय दत्तसारख्या कसलेल्या कलाकाराबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
संजय दत्त बरोबर काम करायचे म्हटल्यावरच मला आतून भीती वाटू लागली. पहिल्या दृश्यातच मला त्यांच्यावर बंदूक रोखून उभे राहण्याचा प्रसंग करायचा होता. माझ्याकडून हे होणार नाही, असे मी सुरूवातीलाच सांगून टाकले. दिग्दर्शक संजयनी सांगितले की तू यावेळी कबीरच्या भूमिकेत आहेस. कॅमेरा ऑन झाला, माझ्या हातात बंदुक देण्यात आली आणि मी थराथरा कापू लागलो. घाबरल्याने मी संवादही विसरलो. इतकी भीती वाटली की, चार रीटेक झाले. मी हे दृश्य करू शकणार नाही असे मी संजय दत्तला सांगितले. तेव्हा त्यांनी मल अोढून जवळ घेतले आणि रिलॅक्स होण्यास सांगितले. त्यानंतरच मी हे दृश्य देऊ शकलो.