dattatreya, dattajayanti, dattatreya mantra, dattatreya stotram, datta peetham, dattaguru | श्रीदत्ताचा अभंग
आम्ही दत्ताचे नोकर। त्याची खातसो भाकर ।। 1 ।।
कोण काय आम्हा देई। कपाळीचे काय नेई ।। 2 ।।
तुम्ही ऐका हो श्रीमंत। नका होऊ मदोन्मत ।। 3 ।।
धन जाईल जाईल । काळ जीवित खाईल।। 4 ।।
वाचे वदा दत्त दत्त। भावे सेवा साधुसंत।। 5 ।।
रंग प्राण येता कंठी। तेचि तारितील क्षिती ।। 6 ।।
