संबंधित माहिती
- Diwali Mandana Design दिवाळीत या 5 सुंदर मांडना रांगोळी बनवा
- Vasubaras 2023 वसुबारस संपूर्ण माहिती आणि पूजा करण्याची योग्य पद्धत
- घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी दिवाळीला या गोष्टी घरात आणा
- Dhanteras 2023 धनत्रयोदशीला या 10 शुभ वस्तू खरेदी करा आणि जीवनात सुख - समृद्धी मिळवा
- Vastu tips दिवाळीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तुनुसार दारावर लावा तोरण
वसुबारस निमित्त गायीची आरती
धेनू माय जगत जननी, लोकत्रय त्रिताप शमनी।
अखिल जगतास मोक्ष दानी, जिचे नि सालकृंत अवनी
निगमागम जिला गाती
निगमागम जिला गाती
वंदीती सुरवर मुनिजन। पुनित पतित जन। घेता दर्शन।
प्रियकर शिव सांबा, सुरभि सौख्यद जगदंबा ।।1।।
गोमुत्रात वसे गंगा, कमला गोमयात रंगा।
अखिल देवता जिचे अंगा, सदाजी प्रियकर श्रीरंगा।
जियेचे नेत्र सूर्यचंद्र
जियेचे नेत्र सूर्यचंद्र
पहा उपेंद्र गोकुळी। कृष्णवाळ अवतार नखाग्री। गोवर्धन धरुनी।
रक्षी गोवत्स कृपा करुनी ।।2।।
धेनू माय...
पुढील लेख
